kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक राजधानीचे वैभव ; ५८ व्या वर्धापन दिनी उल्हास पवार यांचे गौरवोद्गार

चौकट:
मराठी भाषा, मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट टिकले पाहिजेत हे केवळ भाषणापुरते न राहता आपण त्यासाठी काय करणार आहोत, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी नमूद केले. सध्याच्या काळात चित्रपटगृह बंद होत आहेत. मल्टिप्लेक्स सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध होत नाही. या सर्व परिस्थितीबाबत रसिकांपासून राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे, असे वाडेकर यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंग मंदिराचा पुनर्विकास करताना कलाकार आणि रसिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे पुनर्विकास केला जाईल, याची ग्वाही त्यांनी दिली.