kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा युद्धात मृत्यू ; इराणमध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर

जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलने दावा केला आहे की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले आहेत. खामेनी यांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयांजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसंच त्यांच्या घराजवळ बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आलं. त्यामुळे खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या दाव्यांनंतर आता इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA आणि प्रमुख वृत्त वाहिनी प्रेस टीव्ही यांनीही खामेनी यांच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे. ज्यावेळी त्यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली तेव्हा खामेनी आपल्या कार्यालयातच उपस्थित होते. अयातुल्ला खामेनी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत ठार झाले आहेत अशी बातमी या दोहोंनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करत इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला असं म्हणत पोस्ट लिहिली होती. तर आम्ही इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार केलं आहे असा दावा नेत्यानाहू यांनी केला.