पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला पुन्हा एकादा अपघात झालाय. सातारा-पुसेगाव रस्त्यावर फॉर्च्यूनर आणि बोलेरो गाडीची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत १० वारकरी महिला किरकोळ जखमी झालेत. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. हाती आलेल्या माहितीनुसार,सातारा पुसेगाव येथे ही दुर्घटना झालीय. वारकरी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन परतत होते, त्यावेळी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.
अपघातात दहा वारकरी महिला जखमी झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. एक दिवसापूर्वी बारामतीजवळ जेजुरीतही अपघाताची घटना घडली होती. यात एका कारने मध्यरात्री बारामतीत वारकऱ्याला उडवले. या भीषण अपघातात वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विष्णू रामचंद्र पवार असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव होतं.
बारामतीजवळ एका भरधाव वेगात असलेल्या एका कारने वारकऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या घटनेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विष्णू रामचंद्र पवार असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव होतं. ते ६७ वर्षाचे होते. विठू माऊलीच्या दर्शनासाठी ते पंढरपूरकडे निघाले होते. रात्रीच्या वेळी एका भरधाव कारने त्यांना धडक दिली यात त्यांचा मृत्यू झाला.















