kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबईत दाखल! लोकभवनात शपथविधी होणार

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी ९ मार्च रोजी पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि रितू तावडे यांनी त्यांचं स्वागत केले. नवनियुक्त राज्यपालांचा मंगळवारी १० मार्च रोजी दुपारी ४:३० वाजता राजभवन मुंबई येथे शपथविधी सोहळा होणार आहे.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना राजभवनात आगमनावेळी पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.