kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

डोळ्यातले अश्रु पुसावे ते शिवसेनेनेच….; ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांची पोस्ट चर्चेत

राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अनेक शहरांना, गावांना ऑरेंज किंवा रेड अलर्ट देण्यात आला. अनेक ठिकाणी पूरस्थिती झाल्याचे दिसून आले. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे नुकसान देखील झाल्याचे दिसून येत आहे. अशातच, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पूरग्रस्त भागातील इयत्ता 12वीत शिकणाऱ्या मुलीला शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून लॅपटॉप दिल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती देत पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून सर्वत्र या गोष्टीची चर्चा होत आहे. अयोध्या पोळ यांनी पोस्ट मध्ये नेमके काय म्हंटले आहे जाणून घेऊया

डोळ्यातले अश्रु पुसावे ते शिवसेनेनेच….

काल सायंकाळी अंबादास दानवे दादा यांना कॉल केला पण दौऱ्यात असल्यामुळे दादाकडून तो कॉल उचलल्या गेला नाही म्हणुन मेसेज केला की एक इयत्ता 12वीत शिकणारी पूरग्रस्त मुलगी रडत होती तिला काही मदत करता येईल का म्हणुन..

लगेच दादाचा रिप्लाय आला. मुलीची माहिती घेण्यासाठी हिंगोली व नांदेडच्या पत्रकार दादांना कॉल केले आणि माहिती मिळाली ती अंबादास दादाला पाठवली.

“त्या मुलीसाठी आपण काय काय मदत करु” हे विचारण्यासाठी अंबादास दादाचे 3 कॉल आले. तिसऱ्या कॉलवर दादाने “त्या मुलीला आपण लॅपटॉप देऊ” हे सांगीतलं आणि आज ते दिले देखील. सोबत मुलीचा व्हिडिओ जोडत आहे.

आज महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणुन पूरग्रस्त भागात अंबादास दानवे दादाचा दौरा सुरु आहे. 29 ऑगस्ट ला दादाची टर्म संपत आहे तरी दादा आपले कर्तव्य बजावत आहेत. एक शेतकरी अन मराठवाड्यातील सुपुत्र म्हणुन कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ याची जाण आहे अंबादास दानवे दादाला.

नांदेड जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार व कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या रील्स पाहिल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली म्हणुन पण मदत मात्र एकानेही केली नाही. ती मदत केली अंबादास दानवे दादांनी.

शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक यांचे प्रश्न सोडवावे ते शिवसेनेनेच. आमचा इतिहास संघर्ष करण्याचा आहे अन त्यात समस्त शिवसैनिक स्वतःला वाहून घेतात. ते म्हणतात “ना जिथे विषय गंभीर तिथे शिवसेना खंबीर”.

सदरील प्रकरणी पोस्ट यासाठी करत आहे की आमचा अंबादास दादा असो की आमचे नेतृत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असो यांना सामान्यांना केलेली मदत कधी सोशल मीडियावर टाकता आली नाही की त्याचा गाजावाजा करता येत नाही. आमच्या उद्धवजी साहेबांनी कोणताही गाजावाजा न करता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी दिली पण त्याचा पीआर काही करता आला नाही. ते म्हणतात न एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळली नाही पाहिजे तशी आमच्या उद्धवजी साहेबांची अन आमचे नेते अंबादास दादांची सवय आहे.

अंबादास दादाचा भाऊ म्हणुन आणि आक्रमक पण प्रसंगी संवेदनशील व प्रेमळ नेता म्हणुन सदैव अभिमान आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामान्यांसाठी लढणारा विरोधी पक्षनेता म्हणुन आपली इतिहासात नोंद राहील दादा..
https://www.youtube.com/shorts/chdNXdq08fc