kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

1 देवेंद्र आणि 40 गद्दार, तुमच्या पोटात पाप म्हणून रात्रीच्या अंधारात पळून गेले, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी साधे भोळे पणाने विश्वास ठेवला आहे. पण साहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन देवेंद्र फडणीस यांनी फुस लावली आणि एकनाथ शिंदे यांनी गद्दार केल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. समोरुन वार करायला हवा होता, उठाव कशाला म्हणतात, तुम्ही 40 जण एकेक करुन अंधारात पळून गेले. तुम्ही खरे होते तर तोंड झाकून पळावे का लागले? असेही अंधारे म्हणाले. पाचोरा भडगाव विधानसभेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांच्या प्रचारसभेत अंधारे बोलत होत्या.

तुमच्या पोटात पाप होते, म्हणून रात्रीच्या अंधारात पळून गेले. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला हलक्यामध्ये घेतलं म्हणून हे घडले. आता पिक्चर काढायचा आहे, एक देवेंद्र आणि 40 गद्दार त्यात एक पाचोऱ्यातील गद्दार. लाडक्या बहिणीबद्दल प्रेम असेल तर किशोर पाटील यांनी आपल्या बहिणीला आमदार करण्यासाठी माघार घ्यावी असेही अंधारे म्हणाल्या.

जे स्वतःच्या बहिणीची बदनामी करतात ते कोणाचेच भाऊ असू शकत नाहीत असा टोला देखील त्यांनी लगावला. तुम्ही कसले भाऊ, तुम्ही ज्यांच्याशी हात मिळवले, ज्यांनी निर्मल सिड बंद करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हजारो कुटुंबाच्या पोटावर पाय ठेवण्याचा हा प्रकार असल्याचे अंधारे म्हणाल्या. तुम्ही काय विकास केला आणि काय नाही ते आम्हाला सगळं माहीत आहे. तुम्हाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? पाचोऱ्यातील जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करता, पणं यावेळी हे शक्य नाही असेही अंधारे म्हणाल्या.

तुमच्या गद्दारीचा इतिहास तर सगळ्यांना माहीत आहे. यांची गुंडागर्दी आणि दहशतवाद संपवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. पेपर फुटल्याच्या घटना वाढल्या आहेत. कारण परीक्षा पद्धतीमध्ये ठेकेदारी वाढली आहे. राज ठाकरे यांना काय करायचे तेच कळलं नाही. ते कन्फ्युज आहेत. त्यावर बोलावे वाटत नाही, असेही अंधारे म्हणाल्या. मुलांनी शिक्षण घेऊन त्यांना नोकऱ्या नाहीत. अनेक प्रकल्प आता गुजरातला पाठवले जात आहेत. तरी आम्ही बोलायचे नाही का? बदल करण्याची आवश्यकता आहे. किती वेड्यात काढता लोकांना, मराठा आरक्षणाच्या मागण्यावर लाठी हल्ला केल्याचा उल्लेखही अंधारे यांनी केला.