kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई विद्यापीठातील वस्तीग्रहांची “फी” दरवाढ रद्द करा… ॲड.अमोल मातेले यांची मागणी..

मुंबई विद्यापीठाच्या वस्तीगृहात शिकणारे बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असून,आपलं उच्च शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहात राहून शिकत असतात. वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना ज्या मूलभूत सुख-सुविधा द्यायला पाहिजे त्यांचा पूर्णपणे वनवा आहे. मागील तीन-चार महिन्यापासून विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी वस्तीग्रहाच्या सुख सुविधांसाठी वायफाय, अन्नपदार्थ, पिण्याचे पाणी, साफसफाई असेल मूलभूत प्रश्न घेऊन संघर्ष करत आहेत. पण विद्यापीठाने पूर्ण डोळे झाक पने या मागण्याकडे दुर्लक्ष करून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना वाटण्याच्या अक्षता लावून,उलट मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहाची एकदम पाच हजार रुपयांची फी वाढ करून, ही काय मोगलाई माजली आहे का ? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ऍड.अमोल मातेले यांनी केला. फी दर वाढ कोणत्याही विद्यार्थ्याला मंजूर नाही. मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात शैक्षणिक २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात ५ हजार रुपयांनी आणि पी. एचडी.च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात ६ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच जाहीर केले.

मुंबई विद्यापीठ प्रशासन मनमानी पद्धतीने काम करून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे काम चालू आहेत. वस्तीग्रह मध्ये मुंबई विद्यापीठाने पायाभूत सुख-सुविधा देणे अपेक्षित असताना मागील काही दिवसापासून वस्तीगृहामध्ये अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे दिले जाते. जेवणामध्ये अळ्या सापडल्या जातात. शुद्ध पिण्याचे पाणी दिले जात. विद्यापीठात टॅंकर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या टाक्या देखील वेळेवर साफसफाई केल्या जात नाही. स्वच्छतागृहांची देखभाल नीट केली जात नाही.वस्तीग्रहाच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छता नाही. दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने निर्णय मागे घ्यावा. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ऍड.अमोल मातेले म्हणाले अनोख्याबद्दल पद्धतीने आंदोलन करावे लागेल.

वसतिगृहात राहणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पर्यंत ५ हजार ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत होते. आता ते १० हजार ५०० रुपये करण्यात आले आहे, वसतिगृहात राहणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात ५ हजार रुपयांनी म्हणजेच ९०.९० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तसेच, पी. एचडी.च्या विद्यार्थ्यांकडून ५ हजार ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये ६ हजार रुपयांनी म्हणजेच १०९.०९ टक्क्यांनी वाढ करून प्रवेश शुल्क ११ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. एका बाजूला शासनाकडून पीएचडीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात नाही. असे हे एडवोकेट अमोल मातेले यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विद्यार्थ्यांना ३०० व इतर विद्यापीठाशी संलग्नित विद्यार्थ्यांना ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी वसतिगृहातील अतिथी खोलीसप्रवेश शुल्क वाढ निरर्थक आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्वरित ही फी वाढ रद्द करावी.