kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेता कार्तिक आर्यनवर कोसळला दुःखाचा डोंगर ; घाटकोपरच्या दुर्घटनेत गमावल्या कुटुंबातील व्यक्ती !

मुंबई घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून दोन दिवस झाले आहेत. यात कार्तिकच्या आईची बहीण, अर्थात अभिनेत्याची मावशी आणि काका यांचे निधन झाले. एअर ट्रॅफिक कंट्रोलचे निवृत्त अधिकारी मनोज चन्सोरिया आणि त्यांची पत्नी अनिता चन्सोरिया अशी त्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनचे काका आणि मावशी पेट्रोल पंपाजवळ लाल रंगाच्या एसयूव्हीमध्ये होते. ही होर्डिंग कोसळली तेव्हा होर्डिंगच्या खाली ही एसयूव्ही देखील होती.

व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि मुलगा यशला भेटण्यासाठी हे दाम्पत्य या भागातून जात होते.दोन दिवसांनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या ठिकाणी कारसह ७० हून अधिक वाहने ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आली आहेत.

मुंबईतील घाटकोपरमधील छेडानगर भागात एका पेट्रोल पंपावरील १२० बाय १२० फूट उंच होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणठार तर ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घाटकोपर उपनगरात १६ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात एजन्सीचे संचालक भावेश भिंडे यांना शुक्रवारी मुंबई कोर्टाने २६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.