kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दहा दिवसांनी गुरू बदलणार चाल, ‘या’ चार राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह हे वेळोवेळी आपलं स्थान बदलत असतात. कधी ते राशी बदल करतात तर कधी एक नक्षत्र सोडून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतात. स्थान बदलाच्या या घटनेला ज्योतिषशास्त्रात खास महत्त्व असतं. मेष ते मीन या १२ राशींवर याचा शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला धन, सुख, सौभाग्य, अपत्य, ज्ञान आणि सदाचार यांचा कारक मानलं गेलं आहे. जेव्हा कुंडलीमध्ये गुरूची स्थिती मजबूत असते तेव्हा व्यक्तीला प्रत्येक कार्यात अपार यश मिळते. त्याचबरोबर गुरूची कमकुवत स्थिती ज्ञान, संपत्ती आणि प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करते, असं म्हणतात.

हिंदू दिनदर्शिकेनुसार मंगळवार, २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी गुरू रोहिणी नक्षत्र सोडून मृग नक्षत्रात प्रवेश करेल आणि २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत या नक्षत्रात राहील. ज्याचा १२ राशींवर परिणाम होणार आहे. गुरूचं नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या जीवनात कल्याणकारी बदल घडवून आणेल, तर काही राशींना या काळात किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

मेष

गुरूचं नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांचं झोपलेलं भाग्य उजळवू शकते. या काळात तुम्हाला समाजात खूप मान-सन्मान मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत सापडतील व धनलाभ होईल. व्यवसायाची स्थिती मजबूत राहील. उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात फायदा होईल. भौतिक संपत्तीत वाढ होईल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता वाढेल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात गुरूचं गोचर आनंद घेऊन येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरमध्ये मोठं यश मिळेल. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळतील. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायाची स्थिती मजबूत राहील. आर्थिक बाजू मजबूत होईल.

कन्या

गुरूचं संक्रमण कन्या राशीला प्रचंड लाभ मिळवून देईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या अनेक सुवर्णसंधी प्राप्त होतील. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक जीवनात यशाच्या पायऱ्या चढू शकाल. वडिलोपार्जित मालमत्तेतून धनलाभ होईल.

धनु

मृग नक्षत्रात गुरूचं संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या काळात व्यवसायात नफा कमवाल. व्यावसायिक जीवनातील कामाचं कौतुक होईल. कामाच्या अनुषंगानं परदेश प्रवास शक्य होईल. संपत्तीत वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.