kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“अजित दादांनी कोट्यावधी रुपये उचलणाऱ्यांवर इतकं प्रेम करु नये” ; सुरेश धस यांचा टोला

“धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अनेक बोगस बिलं उचलण्यात आली. आता मी उद्या या बोगस बिलांची तक्रार उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार आहे”, असे विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. “अजित पवारांनी एखाद्यावर इतकंही प्रेम करु नये”, असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला.

सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. एकूण ७३ कोटी ३६ कोटी बोगस बिल दाखवून उचलले आहे. एवढे बोगस बिलं राज्यातील कोणत्याही एका मतदारसंघात उचलले गेले नसतील. मी पाचव्या टर्मचा आमदार आहे. मी असा उद्योग माझ्या राजकीय जीवनात केला नाही. हा उद्योग पालकमंत्री आणि तत्कालीन सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत २०२१ ते २०२३ मध्ये एकट्या अंबाजोगाईत झाला आहे, असे सुरेश धस म्हणाले.

मी यादी कुणाकडेच दिली नाही. राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री येणार आहेत. उद्या देणार नाही. त्यांना माहिती होणारच आहे. अजितदादांकडे तक्रार देणार आहे. आपले शागीर्द किती चांगला कारभार करतात हे दाखवणार आहे. संजय मुंडे… मला असं कळलं. २०२२ ला संजय मुंडे रिटायर झाले. बोगस बिले दिले. त्यांना आजार झाला. ते कुठे आहेत ते सापडत नाही. देवदयाच्या कृपेने ते चांगले असावे. ते परळी परिसरात नाही. त्यांना किडनीचा आजार झाला म्हणे. बिलं उचलून दिल्यावर किडनीचा आजार झाला, असेही सुरेश धस यांनी म्हटले.

“अजितदादा हे सातव्या उपमुख्यमंत्री राहिले आहेत. माझेही काही काळ नेते होते. ते माझा एकेरी उल्लेख करू शकतात. त्यांचं वय माझ्यापेक्षा अधिक आहे. मी लहान माणूस आहे. माझा एकेरी उल्लेख केला काय, अरे तुरे केलं काय मला काही वाटत नाही. अजितदादा रागारागात बोलतात. नंतर प्रेम करतात. त्यांनी एवढं प्रेम करू नये, ६३ कोटी उचलणाऱ्यांवर एवढं प्रेम करू नये”, असे सुरेश धस म्हणाले.

“ते नड्डा आणि अमित शाहांसोबत बोलू शकतात. ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांचं म्हणणं बरोबर आहेत. आम्हा छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण? मीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. फक्त त्यांनी एवढी बोगस बिले कशी दिली याचं उत्तर द्या बुवा”, असा सवाल सुरेश धस यांनी केला.