kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘कौन बनेगा करोडपती 16’ च्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांनी दिला मायकल जॅक्सन सोबतच्या आठवणींना उजाळा

सप्टेंबर रोजी महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरील ‘कौन बनेगा करोडपती 16’ च्या सेटवर गडचिरोली मधील आदिवासी भागात आरोग्य सेवेत मोठी क्रांती घडवून आणणारे पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग हे सहभागी होणार आहेत. यावेळेस अमिताभ बच्चन त्यांचा सन्मान देखील करणार आहेत. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक देखील या शोमध्ये होणार आहे.

या वेळी महानायक अमिताभ बच्चन यांनी डॉक्टर राणी बंग यांच्याशी दिलखुलास चर्चा देखील करणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी डॉ. राणी बंग यांना यावेळेस तुमचा आवडता गायक कोण आहे, याबद्दल विचारले असता राणी बंग यांनी मायकल जॅक्सन आवडत असल्याचे सांगितले. दरम्यान, राणी बंग यांनी अमिताभ बच्चन यांना विचारले की, मायकल जॅक्सन आणि तुमच्या एका भेटीबद्दल मी खूप ऐकले आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल. त्यावर अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “एका चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान मी न्यूयॉर्कमधील हॉटेलमध्ये थांबलो होतो, तेथे एक दिवस माझे दार वाजवण्याचा आवाज आला. त्यानंतर मी थेट दार उघडले असता साक्षात मायकल जॅक्सन समोर उभा होता. जगात सगळ्यात जास्त मागणी असलेला पॉपस्टार आपल्या दारासमोर उभा पाहून मला धक्काच बसला. त्यानंतर काही मिनिटं मला काय बोलावे तेच सुचत नव्हते. मी अक्षरशः स्तब्ध झालो. त्यानंतर मायकल जॅक्सनला मी नमस्कार केला. त्यावर मायकल जॅक्सन ने मला विचारले की, ही माझी खोली आहे का?. मग त्याला आपण चुकीच्या खोलीसमोर उभे असल्याचे उमजले. मात्र, मग तो त्याच्या खोलीत निघून गेला. नंतर आम्ही त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. काही तासानंतर त्यांनी देखील आम्हाला वेळ दिली आणि आमच्याशी दिलखुलास चर्चा केली. तो अतिशय नम्र व्यक्ती होता. अशाप्रकारे आमची पहिल्यांदा भेट झाली होती.”

पुढे बोलताना बच्चन म्हणाले की, “न्यूयॉर्कमध्ये मायकल जॅक्सनचा एक कार्यक्रम होता, तिथे जाणे खूपच अवघड होते. आम्ही हॉटेलवर आलो, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, हॉटेलमध्ये खोल्या उपलब्ध नाहीत. आम्ही त्यांना अनेक विनवण्या केल्या. मात्र, त्यांनी काही ऐकलेच नाही. नंतर अधिक चौकशी केली असता असे समोर आले की, मायकल जॅक्सन आणि त्याच्या टीम साठी 350 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. खूप प्रयत्न केल्यानंतर स्टेडियमच्या बाजूला आम्हाला काही खोल्या मिळाल्या. त्यानंतर आम्ही त्या स्टेडियमवर मायकल जॅक्सन याचा गाण्याचा आणि डान्सचा कार्यक्रम पाहिला. त्याचे गायन म्हणजे अप्रतिमच. जेव्हा तो स्टेजवर आला, त्यावेळेस स्टेडियममध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. त्याच्यामधील ऊर्जा ही अतिशय प्रचंड अशी होती.”

13 सप्टेंबर रोजी ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन 16′ च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहण्यास विसरू नका.