kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिव सहकार सेनेची झाली महत्वाची बैठक ; पहा कोण कोण होते उपस्थित

शिव सहकार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल कदम व रायगड (दक्षिण) जिल्हा संपर्क संघटक दिलीप रघुनाथ कदम यांनी महाड विधानसभा क्षेत्रात शिव सहकार सेनेची संघटनात्मक बांधणीसाठी करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या सूचनेनुसार महाड विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या सन्माननीय स्नेहलताई जगताप, उप-जिल्हाप्रमुख प्रभाकर मोरे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमान (नाना) जगताप, युवासेना रायगड दक्षिण जिल्हा अधिकारी चेतन पोर्टफोले, शिवसेना महाड तालुकाप्रमुख आशिष पळसकर, महाड शहरप्रमुख सुदेश कलमकर यांच्या सोबत आज सोमवार दि.१४.१०.२०२४ रोजी दुपारी १ वा स्नेहलताई जगताप यांच्या महाड येथील संपर्क कार्यालयात बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत शिव सहकार सेनेची रायगड दक्षिण जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली. शिव सहकार सेनेचे उपाध्यक्ष अनिल कदम यांनी शिव सहकार सेनेच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती उपस्थित सर्व पदाधिकारी यांना करून दिली व भविष्यात शिव सहकार सेनेची महाड तालुक्यात तसेच रायगड दक्षिण जिल्ह्यात संघटनात्मक रचना कश्याप्रकारे असावी याबाबत संकल्पना समजावून सांगितली.

उपरोक्त सदर बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तसेच कैलास मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.