kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

विधानसभा निवडणूक : काँग्रेसने कंबर कसली; 38 आमदारांना सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारीच्या सूचना

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच नागपूर शहरातील सहा हि विधानसभा मतदारसंघावर काही दिवसांपूर्वी काँग्रेसने दावा केला होता. आता त्या अनुषंगाने या सर्व मतदारसंघात निवडणूक पूर्व तयारीलाही सुरवात झाल्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले होते.

काँग्रेसने आपल्या सीटिंग आमदारांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार मतदारसंघात ब्लॉक अध्यक्ष आणि बूथ प्रमुखांच्या बैठक, जेष्ठ कार्यकर्त्यांचे सत्कार, मेळावे सुरु झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, चार आमदार लोकसभेचे खासदार झाले तर एका आमदारांचे निधन झाले. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या 38 आमदारांनी सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारी सुरु केली. उत्तर नागपूर या विधानसभा मतदार संघात नितीन राऊत हे आमदार आहे. त्यांनी देखील जोरदार निवडणूक पूर्व कॅम्पेन सुरू केल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे राज्याची उपराजधानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात काँग्रेसने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचे चित्र आहे.

नागपूर शहरातील सहा हि विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत 71 इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केले आहे. यात सर्वाधिक अर्ज हे मध्य नागपूर विधानसभेसाठी 30 अर्ज आले असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी देखील काँग्रेस मध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याचे ही विकास ठाकरे म्हणाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपक्षाने उसंत घेत घवघवीत यश मिळवले होते. तर राज्यासह विदर्भात काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वासही आमदार विकास ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केलाय.