kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा जाहिरनामा समिती जाहीर ;अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड…

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.

या जाहीरनामा समितीमधील सदस्य खालीलप्रमाणे : कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नायकवडी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, रुपालीताई ठोंबरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष नजीब मुल्ला, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माध्यम सल्लागार संजय मिस्कीन आदींचा समावेश आहे.