kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले ; पहा अमरावतीत नेमकं काय झालं

अमरावतीतील सायन्स कोर मैदानाचे आरक्षण मिळाल्यानंतरही सभा घेण्यास परवानगी नाकारल्याने आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. यावेळी बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

ते म्हणाले, आम्ही 5 एप्रिलला अर्ज केला होता. त्यानंतर 7 आणि 12 तारखेला अर्ज केला होता. नंतर 18 एप्रिलला या जागेची परवानगी आम्हाला देण्यात आली होती. आमच्याकडे प्रशासनाच्या परवानगीची कागदपत्रे पुरावे आहेत. आम्हाला 23 आणि 24 एप्रिलला सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 21 आणि 22 तारखेसाठी परवानगी मिळाली होती.

आम्हाला परवानगी असूनही इथे येण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केला जातोय, असे सायन्स कोर मैदानावर ठिय्या मांडलेल्या बच्चू कडू यांनी म्हटले तर अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आमची परवानगी नाकारली जात आहे, असं पोलीस म्हणत आहेत. तर आम्ही 23 आणि 24 तारखेचे पैसे भरले आहेत. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगिलतं की, उद्या आमची सभा आहे. पण पोलिसांनी सांगितलं की, तुमची परवानगी बिरवानगी गेली चुल्ह्यात. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. गृहमंत्री येऊनच कायदा आणि आचारसंहिता भंग होत असेल तर मला वाटतं काहीच शिल्लक आता नाही, असे कडू म्हणाले.