kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

५० हून अधिक औषधांवर बंदी, या गोळ्या चुकूनही घेऊ नका

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) गुणवत्ता चाचणीत ५३ औषधे नापास केली आहेत. यामध्ये बीपी, मधुमेहाच्या औषधांचा देखील समावेश आहे. CDSCO ने बंदी घातलेल्या औषधांमध्ये डायक्लोफेनाक, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोल आणि काही व्हिटॅमिन औषधांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे ही औषधे देशातील अनेक मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या बनवतात. पण त्या औषध गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी ठरले. त्यामुळे त्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

CDSCO ने ४८ औषधांची यादी जाहीर केली असली तरी ५३ औषधे चाचणीत अपयशी ठरल्याची माहिती आहे. कारण ५ औषधे बनवणारी कंपनी हे त्यांचे औषध नसल्याचे सांगत आहे. म्हणजेच त्यांच्या कंपनीच्या नावानेच बनावट औषधे बाजारात विकली जात होती. ज्या औषधांवर बंदी घालली गेलीये त्यामध्ये सन फार्माची Pantocid टॅब्लेट या औषधाचीही समावेश आहे. जी औषध ऍसिड रिफ्लक्सच्या उपचारांसाठी वापरले जातात. गेल्या काही वर्षांत या औषधांचा वापर वाढला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या, उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेलकल आणि पल्मोसिल इंजेक्शन देखील चाचणीत अयशस्वी ठरले आहे. अल्केम हेल्थ सायन्सचे अँटीबायोटिक क्लॅव्हम ६२५ औषध देखील अयशस्वी ठरले आहे. काही फार्मास्युटिकल कंपन्यांनी असा दावा केला आहे की सीडीएसओने चिन्हांकित केलेल्या औषधांच्या बॅचेस बनावट आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या नाहीत.

केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, ग्लुकोअमायलेज, पेक्टिनेस, एमायलेस, प्रोटीज, अल्फा गॅलॅक्टोसिडेस, सेल्युलेज, लिपेज, ब्रोमेलेन, झायलेनेज, हेमिसेल्युलेज, लैक्टेज, बीटा-ग्लुकोनेज, माल्ट डायस्टेस यांचा धोका आहे. ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे त्यात केसांच्या उपचारांसाठी वापरले जाणारे अँटीपॅरासायटिक औषधांचाही समावेश आहे. सरकारने लोकांना या औषधांच्या जागी इतर औषधे वापरण्याचा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारने १५६ फिक्स्ड डोस औषधांवर बंदी घातली होती. ही औषधे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचेही सरकारने म्हटले होते. औषध सल्लागार मंडळाच्या शिफारशींनंतर सरकारने हा निर्णय घेतला होता. फिक्स्ड डोस औषधे म्हणजे FDC ही अशी औषधे आहेत ज्यात एका गोळीत एकापेक्षा जास्त औषधे मिसळली जातात, ती घेतल्याने त्वरित आराम मिळतो.