भारताच्या सात शहरांना पाकिस्तानने टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत मोठा हल्ला केला आहे. तर लाहोर आणि कराचीत हल्ला करून पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं आहे. भारताच्या मिसाईल आणि ड्रोनचा आक्रमक मारा पाहून पाकिस्तानने अखेर संपूर्ण देशात ब्लॅक आऊट केला आहे. भारताने हल्ला केला तरी टार्गेटवर हल्ला होऊ नये म्हणू पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.
भारताने अखेर पाकिस्तानवर हल्ला केला आहे. वॉर्निंग देऊनही पाकिस्तानने कुरापती सुरू ठेवल्याने भारताने हल्ला केला आहे. मिसाईल आणि ड्रोनने हल्ला केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानने अख्ख्या पाकिस्तानात ब्लॅकआऊट जारी केला आहे. तर भारताने सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला आहे. पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यास सांगितलं आहे. तसेच सायरन वाजताच प्रतिसाद देऊन ब्लॅकआऊट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगालने मोठा निर्णय घेतला आहे. या ठिकाणच्या सरकारी अधिकारी, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच या भागातील शाळांना पुढील आदेशापर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक किलोमीटर लांब सीमा आहे. पंजाब राज्यातून ही सीमा सुमारे 532 किमी आहे, राजस्थानातून 1070 किमी तर गुजरातमधून 506 किमी लांब आहे. याशिवाय, पश्चिम बंगालची सीमा बांग्लादेशसोबत 2,217 किलोमीटर लांब आहे.
पंजाबमधील काही शाळा पूर्वीच बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या शाळा आणि महाविद्यालय राज्यातील सीमावर्ती जिल्हे – फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, गुरदासपूर आणि अमृतसर – येथे स्थित आहेत. या शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता हा आदेश संपूर्ण पंजाब राज्यात लागू करण्यात आला आहे.
याशिवाय, काश्मीरमधील स्कूल एज्युकेशन डायरेक्टर यांनीही काही जिल्ह्यांतील शाळांसाठी सुट्ट्यांचे आदेश दिले आहेत. यामध्ये कठुआ, बारामुला, कुपवाडा, श्रीनगर आणि अवंतीपोरा येथील शाळांचा समावेश आहे. हे आदेश 9 आणि 10 मेसाठी लागू होते, मात्र आता संपूर्ण प्रदेशात लागू करण्यात आले आहेत.
ट्विटर अकाऊंट बंद
पाकिस्तानकडून युद्धाच्या बाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये, चुकीची माहिती दिली जाऊ नये म्हणून भारताने एकूण 8 हजार ट्विटर खाती बंद केली आहेत. पुढील आदेश येईलपर्यंत ही खाती बंद राहणार असल्याचं समोर येत आहे.
27 विमानतळे बंद
भारताने खबरदारीचा उपाय म्हणून देशातील एकूण 27 विमानतळे बंद केली आहेत. पाकिस्तानमधील विमानतळेही बंद झाली आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील विमानतळांवर विमानांची प्रचंड गर्दी झाली आहे.
Leave a Reply