kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बिग बॉस मराठी : कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! म्हणाली- “मी १०० टक्के दिले, पण…”

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझनचा ग्रँड फिनाले सुरू आहे. कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकून यंदाच्या पर्वाचा विजेता होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. त्यामुळे अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होते. जान्हवीनंतर अंकिताचा घरातील प्रवास संपला आहे. बिग बॉस मराठीच्या ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न बघितलेल्या अंकिताला मात्र पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

“खूप छान प्रवास होता. खूप काही शिकायला मिळालं. कधीच विचार केला नव्हता, असा काहीतरी शो करेन. लहानपणापासून आईने केवळ अभ्यासाची पुस्तकं हातात दिली. त्यामुळे टास्क खेळताना बझर वाजवताना पण मला सुरुवातीला हे जमेल की नाही असं वाटलं होतं. मी माझं १००% दिलं. टॉप ५ मध्ये जाण्याचा पण विचार केला नव्हता. पण, खूप मस्त वाटतंय”, असं अंकिता म्हणाली.

अंकिताचा बिग बॉसमधील प्रवास संपल्यानंतर आता धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि सूरज चव्हाण हे सदस्य टॉप ४ मध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे आता कोण बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.