kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; पडळकर आणि फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीतही देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील नेत्यांनाच संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत भाजच्या दुसऱ्या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे, प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपने जारी केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये विदर्भातील 9 मतदार संघाचा समावेश आहे. तर, पुण्यातून तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही नाव नाही. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जत जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांनी पेठे भरवून अभिनंदन केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विविध योजना व विकासकामांच्या सहाय्याने या सर्व उमेदवारांना विजय मिळण्यास मदत होईल हा मला विश्वास आहे. सर्व… pic.twitter.com/aLT59UgdkX