बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरण तापलेले आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली आहे. तर नवीन तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांकडे दिली आहे. यामध्ये डिनो मोरियो, सुरज पांचाली, आदित्य ठाकरे, अंगरक्षक यांच्यासह इतरांना आरोपी करण्याची विनंती त्यांनी तक्रारीत केली होती. या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. या नवीन दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे.
मालवणी पोलिसांनी यापूर्वीचा दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आहेत. आतापर्यंत या प्रकरणात राजकारण करण्यात येत असले तरी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियान हिने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणे ही देण्यात आली आहे.
मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनुसार, दिशा सालियान ही आर्थिक विवंचनेत होती. सतीश सालियान यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यातून ते एका महिलेला पैसे देत होते. ते सारखे दिशाकडे पैशांची मागणी करत होते. दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती. याविषयी तिने मित्रांना सुद्धा सांगितले होते, असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात सतीश सालियान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालवणी पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टने या प्रकरणाची दिशाच बदलल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने सखोल तपासाची मागणी करण्यात येत आहे.
Leave a Reply