kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

फडणवीस सरकारकडून राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात, १२ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

फडणवीस सरकारमध्ये खातेवाटप होताच प्रशासकीय पातळीवरील बदलास सुरूवात झाली आहे. राज्यातील १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली असून त्यांच्या जागी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली करण्यात आलेली आहे. गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी बदलण्यात आले आहे.

वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून त्याचाच भाग म्हणून या बदल्यांकडे पाहिलं जातंय.
कोणाची कोठे बदली–

1.डॉ. हर्षदीप कांबळे- प्रधान सचिव (उद्योग),उद्योग,ऊर्जा आणि कामगार विभाग,मंत्रालय,मुंबई यांची महाव्यवस्थापक,बेस्टयेथे नियुक्ती करण्यात आली आहे.

2.अनिल डिग्गीकर- महाव्यवस्थापक,बेस्ट यांची अतिरिक्त मुख्य सचिव,दिव्यांग कल्याण विभाग,मंत्रालय,मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3.डॉ. राधाकृष्णन बी. -मुख्यमंत्र्यांचे सहसचिव,मंत्रालय, यांची महाजेन्को,मुंबईचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4.डॉ.अनबलगन पी. – अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, MAHAGENCO,मुंबई यांची सचिव (उद्योग),उद्योग,ऊर्जा आणि कामगार विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

5.संजय दैने – जिल्हाधिकारी,गडचिरोली यांची आयुक्त,वस्त्रोद्योग,नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6.राहुल कर्डिले -जिल्हाधिकारी,वर्धा यांची महापालिका आयुक्त,नाशिक महानगरपालिका नियुक्ती करण्यात आली आहे.

  1. वनमथी सी. -सहा आयुक्त,राज्य कर यांची जिल्हाधिकारी,वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. संजय पवार -मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,चंद्रपूर यांची सहआयुक्त,राज्य कर,मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

9.अवश्यंत पांडा -आयुक्त,वस्त्रोद्योग,नागपूर यांची जिल्हाधिकारी,गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10.विवेक जॉन्सन -यांची मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

11.अण्णासाहेब दादू चव्हाण – (SCSपदोन्नती) उपायुक्त (महसूल) पुणे विभाग,पुणे यांची महात्मा फुले जिवनदायी आरोग्य योजना सोसायटी,मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  1. गोपीचंद मुरलीधर कदम (SCSपदोन्नती) यांची स्मार्ट सिटी,सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.