kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

उबाठा गटाचे आरमोरीचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश;राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी केले स्वागत…

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.

माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी हा जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार राजू नवघरे, आमदार मनोज कायंदे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.