kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर!

रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला चौथा सीझन घेऊन येत आहे आणि यावेळी, बॉलीवूडची अत्यंत कुशल आणि चपळ डान्सर करिश्मा कपूर परीक्षकांच्या पॅनलमध्ये दाखल होत आहे. सगळ्या वयोगटातल्या चाहत्यांच्या लाडक्या, चिरतरुण करिश्मा कपूरचा मनोरंजन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि तिचे नृत्य कौशल्य यामुळे गीता कपूर आणि टेरेन्स लुईससोबत परीक्षक म्हणून या डान्स रियालिटी शोच्या चौथ्या सीझनसाठी ती अगदी योग्य पर्याय आहे.

करिश्मा या सीझनमध्ये आपला अनोखा दृष्टिकोन घेऊन येईल. प्रत्येक परफॉर्मन्समधला ‘एन्टरटेन्मेंट’चा म्हणजे मनोरंजनाचा गुण ती तपासेल, तर गीता कपूर आणि टेरेन्स लुईस अनुक्रमे स्पर्धकातील ‘न्यू नेस’ म्हणजे नवीनता आणि ‘टेकनिक’ यांचे मूल्यमापन करतील. आणि अशाप्रकारे ते तिघं जण या शोमधले ENT स्पेशलिस्ट असतील!

या सत्रात आणखी मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स, विविध डान्स शैली आणि असामान्य प्रतिभा यांचे दर्शन घडणार आहे. आपल्या या नवीन प्रोजेक्टबाबत उत्साही असलेली करिश्मा कपूर म्हणते, “इंडियाज बेस्ट डान्सर एक जबरदस्त मंच आहे, जो खऱ्या अर्थाने डान्स भावना साजरी करतो. या शोमध्ये मी यापूर्वी अतिथी परीक्षक म्हणून आले आहे. स्पर्धक या मंचावर जे पॅशन आणि समर्पण घेऊन येतात, ते खरोखर प्रेरणादायक आहे! देशाने सादर केलेल्या यंदाच्या प्रतिभावंतांची प्रतिभा अनुभवण्यास आणि जोखण्यास मी उत्सुक आहे. देशातील होतकरू कलावंतांच्या कलेला पैलू पाडण्यासाठी आणि या उद्योगातील आमच्या अनुभवाचा फायदा त्यांना देण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. या प्रवासात गीता आणि टेरेन्ससोबत परीक्षक म्हणून सामील होताना मी रोमांचित झाले आहे.”

इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 लवकरच येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!