kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सुपरस्टार सिंगर 3 मध्ये कुमार सानूला त्याने एका दिवसात 28 गाणी रेकॉर्ड केल्याचा काळ आठवला

या रविवारी, रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 मध्ये मेलडी किंग कुमार सानूचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘नमस्ते 90s’ या विशेष भागात आपल्या एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेसमधून स्पर्धेतील सूर वीर कुमार सानूच्या गाजलेल्या गाण्यांची जादू मंचावर जिवंत करतील. तर मग, सुरेल गाणी आणि सुंदर आठवणींचा खजिना लुटण्यासाठी तयार व्हा, कारण कुमार सानू आपल्या बॉलीवूडमधल्या प्रवासातील काही रंजक किस्से प्रेक्षकांना सांगणार आहे.

सादर झालेल्या सगळ्या छान छान परफॉर्मन्सेसमध्ये यूपीहून आलेली खुशी नागर आणि चंदीगडहून आलेली लाइसेल राय या दोघींनी ‘तेरे दर पर सनम’ आणि ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ ही गाणी आपल्या गोड आवाजात सादर करून सगळ्यांना थक्क करून सोडले. त्यांच्या सादरीकरणाने अवाक झालेला कुमार सानू त्या दोघींचे गुणगान करताना म्हणाला, “खुशी आणि लाइसेल, तुम्ही दोघी फार छान गायलात. तुमचे गायन ऐकून माझे मन आनंदाने भरून गेले. खास करून ‘आए सनम’ ही ओळ. तुमचा सुर अचूक लागला होता. गाण्याचे शब्द, ओळी आणि त्यातल्या भावना तुम्ही ज्या प्रकारे सादर केल्यात, ते अद्भुत होते. तुमचे गाणे ऐकताना हे गाणे मी रेकॉर्ड केले तो काळ मला आठवला. अप्रतिम गायलात! तुम्हाला उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल तुमचे कॅप्टन सलमान आणि पवनदीप यांचेही अभिनंदन. देवाचा वरदहस्त तुमच्यावर नेहमी राहो.”

इतकेच नाही, त्यांचा परफॉर्मन्स ऐकल्यानंतर कुमार सानू आठवणींत रमलेला दिसेल आणि एका दिवसात त्याने तब्बल 28 गाणी रेकॉर्ड केली होती, तो काळ त्याला आठवेल. तो म्हणाला, “मला आठवते आहे, त्यावेळी मी 40 दिवसांच्या US टूरला जाणार होतो. ही 1993 च्या सुमाराची गोष्ट आहे. परदेशी जाण्याअगोदर मी माझी सगळी रेकॉर्डिंग पूर्ण करावी असे साहजिकच संगीतकारांना आणि निर्मात्यांना वाटत होते. म्हणून एक दिवस मी सगळ्यांना माझ्या स्टुडिओमध्ये बोलावले. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत सगळी गाणी रेकॉर्ड केली. एका दिवसात सगळी गाणी पूर्ण केली. आणि दुसऱ्या दिवशी एका मीडिया हाऊसने लगेच प्रकाशित करून टाकले की, कुमार सानूने एका दिवसात 28 गाणी रेकॉर्ड केली! या उद्योगात सगळ्यांना माहीत आहे की, मी सगळ्यात झटपट काम करणारा गायक आहे. मी गोष्टी चटकन आत्मसात करतो. कदाचित मला तसे देवाचे वरदान आहे; त्यामुळेच मी हा विश्वविक्रम करू शकलो. मला आठवते आहे की ‘सोचेंगे तुम्हे प्यार’ हे गाणे मी अवघ्या 9 मिनिटांत रेकॉर्ड केले होते, तर आंखों की गुस्ताखियां’ 20-21 मिनिटांत. तुमची आत्मसात करण्याची आणि मग ते सादर करण्याची क्षमता इथे महत्त्वाची आहे. मला ही क्षमता दिल्याबद्दल मी ईश्वराचा ऋणी आहे.”

सर्व जण टाळ्यांचा गडगडाट करून संगीत क्षेत्रातील कुमार सानूच्या दैदीप्यमान करकीर्दीला मानवंदना देताना दिसतील. शो मध्ये उपस्थित असलेल्या लाइसेल रायच्या वडीलांनी कुमार सानू या आपल्या प्रिय गायकासोबत मंचावरून गाणे म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांचा मान ठेवत कुमार सानू लाइसेल आणि तिच्या वडीलांसोबत ‘दो दिल मिल रहे हैं’ गाणे सादर करताना दिसेल.

हे सुंदर क्षण अनुभवण्यासाठी बघा सुपरस्टार सिंगर 3 या रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!