kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महानायक अमिताभ बच्चन यांनी केबीसी 16 मध्ये 1 कोटींचा प्रश्न विचारताना स्पर्धक चंदर प्रकाश याला सांगितले की “मेरे बाबूजी ने कहा बेटा जब तक जीवन है तब तक संघर्ष है”

महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपतीच्या 16 व्या भागात जम्मू कश्मीर येथील यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय चंदर प्रकाश याला बोलते करणार आहेत. चंदर याला लहानपणापासूनच आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. असे असताना तो केबीसीच्या सेटवर आला आहे. 25 सप्टेंबर बुधवारी 1 कोटी रुपयांचा प्रश्न अमिताभ बच्चन त्याला विचारणार आहेत.


तब्बल 1 कोटी रुपयांचा प्रश्न विचारण्याच्या आधी महानायक अमिताभ बच्चन हे चंदर याचे इथपर्यंतच्या प्रवासाचे कौतुक करतात. तसेच त्याने जीवनात केलेला संघर्ष देखील या वेळी सांगतात आणि तो पुढे देखील प्रगती करेल, असे म्हणून त्याला शुभेच्छा देतात. त्याचप्रमाणे जीवनातील काही अडचणींना समोर जाण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी दिलेला संदेश देखील ते यावेळेस सांगतात. “ मेरे बाबूजीने कहा, बेटा जब तक जीवन है तब तक संघर्ष है”

या वेळी महानायक अमिताभ बच्चन हे चंदरचे कौतुक करून थोडावेळ विषयांतर करून सांगतात की, कौन बनेगा करोडपतीच्या इतिहासामध्ये एका मागोमाग एक 1 कोटी रुपयांच्या प्रश्नांसाठी अनेक जण पात्र होत आहेत. पुढे अमिताभ बच्चन चंदर याचे 50 लाख रुपये जिंकल्याने कौतुक करतात. आणि त्याला म्हणतात की, तुझे या खेळाबद्दल असलेले समर्पण याला मी सलाम करतो. तसेच तू जिद्द आणि चिकाटीच्या बळावर इथपर्यंत पोहोचलास असे देखील ते म्हणतात.”

कौन बनेगा करोडपती चा 16 वा भाग सोनी टीव्हीवर दररोज सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता पहा.