kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये निक्की आणि गौरवमध्ये खडाजंगी: खाण्यावरून झाली बोलाचाली ..

27 जानेवारी पासून या वर्षाची खाद्य दंगल बघण्यासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, एक चविष्ट रियालिटी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ – सबकी सीटी बजेगी”. हा सीझन दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. फराह खान या सीझनची होस्ट आहे, तर रणवीर ब्रार आणि विकास खन्ना हे सेलिब्रिटी शेफ परीक्षक आहेत. मनोरंजनाचा डोस घेण्यासाठी तयार रहा कारण उषा नाडकर्णी, गौरव खन्ना, दीपिका कक्कड, तेजस्वी प्रकाश, चंदन प्रभाकर, अर्चना गौतम, निक्की तांबोळी, राजीव अदातिया, अभिजीत सावंत, फैजल शेख आणि कविता सिंह आपले ग्लॅमरस जीवन सोडून अॅप्रन आणि शेफची हॅट घालून सेलिब्रिटी मास्टर शेफ हा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

केवळ शेगडीच नाही, तर वातावरणच तापले आहे, कारण सगळे स्पर्धक सर्वोच्च स्थान पटकावण्यासाठी एकमेकांशी चढाओढ करत आहेत आणि प्रत्येकाला सुरक्षित राहायचे आहे. त्यातील आव्हानांच्या दबावामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार देखील सुरू झाले आहेत. एका चॅलेंजमध्ये निक्की आणि गौरव यांची जोडी जुळवण्यात आली आणि एकच डिश फराह आणि परीक्षकांना सादर करायची होती. दोन्ही पैकी कोणता पदार्थ टेस्टिंगसाठी सादर करावा यावर त्यांचे एकमत झाले नाही त्यामुळे तणाव वाढला.

या नाट्यात भर घालत निक्की म्हणाली, “मला वाटते की मीच गेले पाहिजे” तर गौरवचा आग्रह होता की, त्याच्याच पदार्थाची चव परीक्षकांनी घ्यावी. त्यावर आक्षेप घेत निक्की म्हणाली, “मला जोखीम घ्यायची नाहीये.” फराहने त्यांना सल्ला दिला की, हार मानू नका, त्यावर निक्की आणि गौरव क्षणाचाही विलंब न करता एकदमच म्हणाले, “तेच तर!” गौरवला टोमणा मारत निक्की म्हणाली, “तू माझी कॉपीच कर फक्त, बास! मला याच्यासोबत का टाकले?”

प्रोमो येथे बघा: https://www.instagram.com/reel/DE2l7BNP0Mw/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

आता निक्की आणि गौरव यांच्यात आग लागली आहे, तर मग कोणाची वाजणार शिट्टी? सेलिब्रिटी मास्टरशेफ सुरू होत आहे 27 जानेवारी रोजी आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता हा शो प्रसारित करण्यात येणार आहे, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!