kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुणे जिल्ह्यात 24 डिसेंबर पर्यंत सुशासन सप्ताहाचे आयोजन

केंद्र शासनामार्फत 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह ‘गांव की और’ या संकल्पेवर आधारित सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भारत सरकार कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन विभागाने https://darpgapps.nic.in/GGW24 हे संकेतस्थळ विकसित केले असून सर्व संबंधित विभागाकडून ‘सुशासन सप्ताह’कालावधीत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती ऑनलाईनपद्धतीने अपलोड करावी, अशा सचूना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिल्या आहेत.

सुशासन सप्ताह निमित्त आयोजित केलेले उपक्रम, मोहिम तसेच कार्यक्रमाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती सर्व विभागांनी सॉफट प्रती [email protected] या ईमेल पत्त्यावर तसेच मूळ प्रती खास दुतासोबत 23 डिसेंबर 2024 पर्यंत या कार्यालयास पाठवावे, असेही श्रीमती कदम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.