kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला आहे. ‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबरस्त टोलेबाजी केली. आमच्याकडे कुणी आले तर कचरा गेला असं म्हणतात सगळे गेल्यावर तुमच्याकडे जे राहील ते काय असेल. अनके जण शिवसनेत पक्ष प्रवेश करत आहेत. पण, अनेकजण तुम्हाला सोडून जात आहेत. का सोडून जातात याचे आत्मपरिक्षण करावे असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे पक्षाला दिला आहे.

किरण सामंतांना संधी असताना देखील राजन साळवींना बोलावून तिकीट द्या असा सांगत होते. ज्या पक्षाला वाळवी लागली आहे तिथे कसा राहील साळवी असं एकनाथ शिंदे म्हणाले. गुवाहाटीला गेल्यावर एक एक करुन 50 जण आमच्यासोबत आले. संपूर्ण महाराष्ट्राने, देशाने इतकचं नाही तर संपूर्ण जगाने आमची दखल घेतली. कोण आहे एकनाथ शिंदे याचा शोध घेतला गेला. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा एक कार्यकर्त्या आहे.

सर्वांनी मिळून कोकणचा विकास करुन. कोकणात अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. देवेंद्र फडवीस यांच्या नेतृत्वात आपण कोकणचे अनेक प्रश्न आपण सर्वांनी मिळून मार्गी लावूया. राजन साळवी यांनी आमच्या सोबत यावे असे अनेक दिवसांपसून मला मनोमन वाटत होते. मात्र, अनेक अडथळे येत होते. त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा योगायोग जळून येत नव्हता. अखेर राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

रात्री 2 वाजता देखील शिवसेनेत पक्ष प्रवेश होत आहे. मोठ्या विश्वासाने अनेकजण शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. घरात बसून, फेसबुकवर लाईव्ह करुन जनतेच्या समस्या सोडवता येत नाहीत असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. यामुळेच मी मंत्र्यांना, आमदारांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना सर्वाना फिल्डवर जाऊन काम करा असा सूचना देत आहे.