kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुणेकरांना अनुभवता येणार फ्रान्सच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा`रोझेओ’ (RoZéO) हा चित्तथरारक एअर शो !

दी फ्रेंच इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, अलायन्स फ्राँसेज नेटवर्कच्या साथीने पुणेकरांसाठी एक चित्तथरारक अनुभव देणारा ‘rozeo’ (रोझेओ) हवाई शो घेऊन आले आहेत. विशेष म्हणजे फ्रेंच संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या या हवाई शो ने नुकतेच पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक 2024 स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या सादरीकरणाने चार चांद लावले आहेत. ग्रात सिएल या फ्रेंच कंपनी तर्फे सादर होणारा रोझेओहा एअर शो उद्या 20 ऑक्टोबर 2024 रोजी अमनोरा मॉल, मगरपट्टा,हडपसर येथे संध्याकाळी 5.30 वा. सादर केला जाणार आहे. सर्व प्रेक्षकांसाठी हा शो विनामूल्य असणार आहे, अशी माहिती शनिवारी अलायन्स फ्राँसेजच्या कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमाच्या संयोजिका स्टेफान जेरार्ड आणि अलयांस फ्राँसेज पुणेच्या संचालिका आमेली विजल यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘RoZeo’ आणि इतर रोमांचक विविध सांस्कृतिक प्रस्तुतींसह अलायन्स फ्रँन्सासेस नेटवर्क भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधील कलात्मक देवाणघेवाण आणखी मजबूत करीत आहे. ही नाविन्यपूर्ण निर्मिती आमच्या कलात्मक समुदायांना जोडणारे एक बंधन म्हणून काम करेल. अन् फ्रान्सच्या कलाकृतीचे दर्शन घडवेल.

RoZéO, हे स्टेफन जिरार्ड आणि कॅमिए बोमिए यांनी पॉलीन फ्रेमोच्या रचना आणि आन जोनाथनच्या कलाकृतींसह तयार केलेली एक अद्वितीय जिवंत प्रस्तुती आहे जी उपस्थित प्रेक्षकांना प्रफुल्लित करते. आकाशाच्या पटलावर हा शो जिवंत करण्यासाठी कलाकार काव्यात्मक पद्धतीने आणि नाजूक हालचाली करीत कलाकुसरीने सादरीकरण करतात. किमान ६ मीटर उंचीच्या धातूच्या खांबांवर हलक्या हाताने डोलणाऱ्या आकृत्या, कॅमर्ग्यूच्या रीडबेडवर जागृत केल्या जातात. संगीताच्या लयबद्ध तालीवर इलेक्ट्राॅनिक्स आणि फिल्ड रेकाॅर्डिंग व साऊंडस्केपसह ४२ मिनिटांची ही सुंदर प्रस्तुती प्रेक्षकांमध्ये एक चिंतनशील वातावरणाची निर्मिती करते. या प्रस्तुतीदरम्यान कला आणि निसर्ग एकमेकांशी समरूप झाल्याचा भास प्रेक्षकांना होतो.

2023 मध्ये RoZéO चा प्रीमियर झाला तसेच त्याच्या ऑलिम्पिक कामगिरीनंतर, कलात्मक दिग्दर्शक थॉमस जॉली यांनी तयार केलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचा भाग म्हणून, त्यांच्या स्वप्नवत नृत्यदिग्दर्शनासाठी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे.