kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजला मिळणार सुखद धक्का, आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. आजच्या भागातही तो प्रेक्षकांना रडवताना दिसून येईल. त्यामुळे सूरजसह प्रेक्षकदेखील भावूक झालेले आजच्या भागात पाहायला मिळतील.

‘बिग बॉस मराठी’च्या नवा प्रोमो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”सूरज स्वागत करुयात आपल्या बहिणींचं आणि आत्यांचं”.

सूरजच्या बहिणी आणि आत्या त्याला म्हणत आहेत,”तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं आहे. सूरजला ‘बिग बॉस मराठी’च्या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणींना आणि आत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.