kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“ते म्हणतायत तुम्ही गेलात…”; रतन टाटांच्या निधनानंतर अभिनेत्री सिमी गरेवालांची पोस्ट चर्चेत

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्यावर सगळ्यांनीच भरभरून प्रेम केले. आता बॉलिवूडपासून इंडस्ट्रीपर्यंत सर्वजण रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत. यादरम्यान, रतन टाटा यांची मैत्रीण-बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल यांनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सिमी यांनी आपला आणि रतन टाटा यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘अलविदा माझ्या मित्रा’.

रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर एक काळ असा होता जेव्हा ते बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल यांना डेट करत होते. सिमी गरेवालने एका जुन्या मुलाखतीत रतन टाटांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. आता रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची आठवण काढत सिमीने रतन टाटांसोबतचा आपला एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘ते म्हणतायत तुम्ही गेलात… तुमच्या जाण्याचं दु:ख सहन करणं कठीण आहे… खूप अवघड… अलविदा, मित्रा.’

२०११ मध्ये एका मुलाखतीत सिमीने रतन टाटा यांचं एका शब्दात वर्णन करताना त्यांना ‘परफेक्शन’ म्हटलं होतं. याचवेळी सिमी यांनी आपण कधीकाळी रतन टाटांसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, याची कबुली दिली होती. याविषयी सांगताना सिमी म्हणाल्या की, ‘रतन आणि माझं नातं खूप जुनं आहे. रतन टाटा म्हणजे परफेक्शन आहेत. त्यांच्याकडे विनोदबुद्धी आहे, ते अतिशय विनम्र व्यक्ती आहेत आणि आदर्श गृहस्थ आहेत. पैसा हा त्यांच्यासाठी कधीच प्रेरक शक्ती राहिलेला नाही. ते परदेशात जितके रिलॅक्स होते, तितके ते भारतात नव्हते. मात्र, त्यांनी सगळ्यांसाठी खूप काही केलंय.’