kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

तितीक्षा तावडेन दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट

लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांची जोडी यावर्षी २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. या दोघांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ओळख, मैत्री अन् नंतर याचं रुपांतर प्रेमात होऊन या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तितीक्षा मूळची कोकणातली आहे तर, सिद्धार्थ हा मूळचा नाशिकचा आहे.

मुंबईत थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर तितीक्षा व सिद्धार्थचं नाशिकच्या घरात जोरदार स्वागत झालं होतं. आपल्या सुनेचं स्वागत हक्काच्या घरात व्हावं अशी सिद्धार्थच्या आई-बाबांची मनापासून इच्छा होती. मात्र, बोडके कुटुंबीयांना यावर्षी गणपतीच्या सणाला नव्या घराचा ताबा मिळाला. यावर्षीचा गणेशोत्सव आणि आता लग्नानंतरची पहिली दिवाळी तितीक्षा-सिद्धार्थने नाशिकच्या नव्या घरात साजरी केली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर तितीक्षाने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत सासरच्या नव्या घराची पहिली झलक तिच्या सर्व चाहत्यांना दाखवली. घरात एन्ट्री घेतल्यावर प्रशस्त हॉल आणि त्यानंतर समोर असलेली बाल्कनी लक्षवेधी ठरते. त्यांच्या घरात एका बाजूला डायनिंग टेबल ठेवण्यात आलं असून, हॉलमध्येच तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नातील सुंदर फोटो ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

तितीक्षाने यानंतर त्यांची व सासू-सासऱ्यांची बेडरूम दाखवली. बोडके कुटुंबीयांच्या घराला सुंदर अशी गॅलरी आहे. या गॅलरीतून गोदावरी नदी व संपूर्ण नाशिक शहराचा व्ह्यू पाहायला मिळतो असं अभिनेत्रीने सांगितलं. याशिवाय आज या गॅलरीत दिवाळीच्या निमित्ताने आम्ही छान-छान फोटो काढले असंही तिने सांगितलं.