kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलगा ‘अकाय’चे केले स्वागत ; कलाकारांसह विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी त्यांच्यावर केला शुभेच्छांचा वर्षाव !

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या दुस-या बाळाच्या आगमनाची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर जोडप्याने मांडलेल्या संयुक्त निवेदनानुसार, बाळाचा जन्म 15 फेब्रुवारी 2024 रोजी झाला आहे. तसेच, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘अकाय’ ठेवल्याचे सांगितले आहे.

विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. या दोघांनीही एक पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती शेअर केली आहे. यानंतर आता विराट कोहली आणि अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षात होत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचा अर्थात वामिकाचा लहान भाऊ ‘अकाय’चं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनियतेचा आदर करा.प्रेम आणि कृतज्ञता, असे या पोस्टमध्ये लिहले आहे.

विराट आणि अनुष्का शर्माचे 11 डिसेंबर 2017 ला लग्न झालं होतं. दोघांचे लग्न इटलीच्या टस्कनीमध्ये पार पडलं होतं. या लग्नाला दोघांचे कुटूंब आणि मित्र परिवार सामील झाले होते . लग्नाच्या तीन वर्षानंतर म्हणजेच 11 डिसेंबर 2021 ला दोघांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले होते. या मुलीचे नाव वामिका ठेवण्यात आले होते. आता वामिकानंतर त्यांच्या घरी एका मुलाचे आगमन झाले आहे. त्याचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे. अकायच्या जन्मानंतर दोघांवर आता दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान विराट अनुष्काच्या पोस्टवर अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री सोनम कपूर, रकूल प्रीतसह अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांसह विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.