kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कोण तू रे कोण तू… जेव्हा मनसे अध्यक्ष कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज

आज संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कवितांची मैफील रंगली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक कविता म्हटली.

राज ठाकरेंनी म्हटलेली कविता

मी आज भाषण करणार नाही. गुढीपाडव्याला माझं भाषण आहे. त्यामुळे मला जे काही सांगायचं हे मी ३० तारखेला सांगेनच. आज मराठी भाषा गौरव दिन. सरकारने जाहीर केला होता, पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करायचा असतो. २००८ मध्ये हा दिवस साजरा करायची सुरुवात आपण केली. त्यानंतर सर्वत्र हे कार्यक्रम करण्याची सुरुवात झाली. यावेळी परत कार्यक्रम करायला हवा, असं मला कोणीतरी सांगितलं, त्यामुळे परत हा कार्यक्रम करतो. सर्व लोक इथे फक्त मराठी भाषेच्या प्रेमाखातर इथे आले आहेत. आशाताईंना बरं नसतानाही त्या इथे आल्या आहेत. हे सगळेच सर्वांना माहिती आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटले.

अनेकांना प्रश्न पडला असेल की जावेद अख्तर इथे काय करणार आहेत. भाषा याा विषयावर मी त्यांचं एक भाषण ऐकलं होतं. आपली भाषा टिकवण्यासाठी भाषा किती महत्त्वाची असते, ती कशी टिकवली पाहिजे, कशाप्रकारे टिकवली पाहिजे, यावरचे एक भाषण मी ऐकलं होतं. त्यानंतर मी जावेद साहेबांना विनंती केली होती की सोनाराने जसं कान टोचावे लागतात, आमच्याकडे अटनबरोंनी दाखवल्यानंतरच महात्मा गांधी समजले. नाहीतर आम्हाला महात्मा गांधी माहितीच नव्हते. मराठी भाषा कशी टिकवली पाहिजे, हे जेव्हा जावेद अख्तर यांच्यासारखे दिग्गज व्यक्ती सांगणार आहेत. आशाताईंनी मला म्हटलं की मी इतक्या कविता, गाणी म्हटली आहेत, मग या सर्व गोष्टींमधून एखादी कविता कशी निवडायची. मी त्यांना तुम्ही इकडे या तरी, असे म्हटलं, असेही राज ठाकरेंनी सांगितले.