नमस्कार !
आपण अष्टपैलू अत्रे या मालिकेत आचार्य अत्रे यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत जाणून घेतले. या भागात आपण त्यांच्या साहित्य क्षेत्राबाबत जाणून घेणार आहोत.
खरतरं कोणत्याही भाषेमधील साहित्य हे त्या भाषेची समृद्धी वाढवत असते. मराठी साहित्यात आचार्य अत्रे यांनी आपलया प्रभावी लेखनाने मराठी साहित्याला वेगळी उंची प्राप्त करून दिली. आचार्य अत्रे यांच्या सर्वच लेखनात व भाषणात खळाळता विनोद होता. ताजेपणा होता. थोडा शिवराळपणा होता. तसेच काहीवेळा अतिशयोक्तीही होती. पण कमालीचे आक्रमक ,धाडसी ,बेदरकार,प्रगल्भ असलेले आचार्य अत्रे अव्वल दर्जाचे उत्तुंग प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.