आज बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सर्वत्र त्याचीच आज चर्चा आहे. शाहरुख खानचे लाखो फॅन्स आहेत त्यातील अनेक फॅन्स त्याच्या घराबाहेर देखील त्याला शुभेच्छा द्यायला त्याची एक झलक बघायला तयार असतात, गर्दी करतात. अनेक किस्से आज शाहरुख खानचे सोशल मीडियावर देखील चर्चेत आहेत. त्यापैकी एक आहे तो म्हणजे २००७ साली झालेला ! २००७ साली समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते अमर सिंह यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य शाहरुख खानने केलं होत. चला तर मग जाणून घेऊया की तेव्हा नेमकं काय घडलं होत
नेमकं काय घडलं होत ?
तर झालं असं होतं की, एका पुरस्कार सोहळ्यात शाहरुखनं समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते अमर सिंह यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मस्करीत केलं असलं तरी अमर सिंह यांच्या समर्थकांना आणि सपाच्या कार्यकर्त्यांना हे फार खटकलं होतं. ‘अमर सिंह यांच्या डोळ्यात मला फक्त क्रूरता दिसते’ असं त्यानं म्हटलं होतं. अवॉर्ड सोहळ्यात हे बोलल्यानंतर सगळे हसले होते, मात्र अमर सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र शाहरुखवर तेव्हा टीका केली होती. अमर सिंह यांच्या समर्थकांनी शाहरुखच्या घराबाहेर आंदोलनही केलं होतं.
शाहरुख खान त्याच्यावर केलेली टीका सहन करू शकतो, पण त्याच्या कुटुंबियांबद्दल बोललेलं तो सहन करत नाही. हे त्यानं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. तुम्ही माझं स्टारडम, पैसा सगळं काही घेऊ शकता, पण माझं कुटुंब आणि मुलांना माझ्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं तो म्हणतो. आपल्या मुलांसाठी तो नेहमीच पुढं असतो.