Breaking News

Goa Statehood Day: घटकराज्य दिनाच्या पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मृख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह देशातील विविध नेते आणि मंत्र्यांनी गोमंतकीयांना गोवा घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी 30 मे हा गोव्याचा घटकराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1987 साली याच दिवशी गोवा भारताचे 25 वे राज्य झाले.

गोव्याची वैविध्यपूर्ण संस्कृती, समृद्ध वारसा आणि निसर्ग सौंदर्याचा देशाला अभिमान आहे. आधुनिकतेचा स्वीकार करत नैसर्गिक सौंदर्य जपण्याची गोव्याची बांधिलकी शाश्वत विकासासाठी एक उल्लेखनीय उदाहरण आहे. आम्ही गोव्याच्या विकास आणि समृद्धीला पाठिंबा आणि प्रोत्साहन देत राहू. राज्य प्रत्येक क्षेत्रात नवीन उंची गाठो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे, गोव्याने गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पर्यटन नकाशावर छाप पाडली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याला समृद्धीच्या नव्या उंचीवर नेत आहेत, गोव्याच्या जनतेला शुभेच्छा देतो, असे गृहमंत्री अमित शहांनी म्हणाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील गोवा घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

घटक राज्य दिन गोव्याचा समृद्ध वारसा, सांस्कृतिक विविधता आणि लोकांच्या प्रेरणेचे स्मरण करतो. गोव्याच्या समृद्धी आणि विकासासाठी काम करत राहण्याचा संकल्प करूया, असे सावंत यांनी म्हटले आहे.