kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सुपरस्टार सिंगर 3 मध्ये अरिभव आणि पिहूचा गझल परफॉर्मन्स पाहून नेहा कक्कडचे डोळे पाणावले

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 च्या भावपूर्ण रजनीसाठी तयार व्हा, कारण यावेळी ‘गझल नाइट’ असणार आहे. या भागात स्पर्धेतील छोटे उस्ताद गझल सम्राट पंकज उधासला आदरांजली वाहताना हृदयस्पर्शी गीते व गझला सादर करून आपले कौशल्य दाखवतील. गझल उस्ताद अनुप जलोटा आणि तलत अझीझ या भागात उपस्थित राहून हा भाग संस्मरणीय करतील. स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेताना हे अतिथी कलाकार पंकज उधाससोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगतील.

या विशेष भागात 7 वर्षीय अरिभव एस. आणि 8 वर्षीय पिहू शर्माने ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है’ गीतावर जो जादुई परफॉर्मन्स दिला, तो अनुभवताना उपस्थितांनी त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिले आणि नेहा कक्कड तर फारच हेलावून गेली!

दोन्ही गायकांना घट्ट मिठी मारून सुपर जज नेहा कक्कड म्हणाली, “मला खरं तर भावुक व्हायला आवडत नाही. पण या मुलांनी त्यांच्या परफॉर्मन्सने मला हलवून सोडले! जणू दोन दिव्य शक्ती गात होत्या! अविश्वसनीय! आणि त्यांची निरागसता बघा, किती निर्मळ आहेत ते! शेवटचा आलाप तर अफलातून होता. त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची निष्ठा याचे हे फळ आहे. तुमच्या आवाजात श्रोत्याला शांत करण्याचे कसब आहे. मी तुमच्या दोघांचे गाणे आयुष्यभर ऐकू शकते. मी तिकीट काढून तुमचा शो पाहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शो करा आणि आमची मान अभिमानाने ताठ करा. तुम्ही दोघेही रॉकस्टार आहात. देवाचा आशीर्वाद तुम्हाला लाभो!”

त्या दोघांचे कौतुक करताना तलत अझीझ म्हणाला, “सात वर्षांची मुलांना तर पुरती स्वरओळख देखील नसते. आणि ही मुले काय सुंदर गायली! अप्रतिम! अनुप आणि मी आम्ही दोघेही थक्क झालो आहोत. खरोखर, पंकजजींनी तुमच्या दोघांचा हा परफॉर्मन्स ऐकला असता तर ते देखील हेलावून गेले असते. मी तुमच्यासाठी इतकेच म्हणेन, “जीते रहो, गाते रहो और ऐसा हंगामा करते रहो.”

हे जादुई क्षण अनुभवण्यासाठी बघा, सुपरस्टार सिंगर 3, दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!