2019 मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या 40 आमदारांसह पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी महायुतीमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर 2023 मध्ये अजित पवारही महायुतीमध्ये सहभागी झाले.
2019 मधील पक्षीय बलाबल काय होते ?
भाजप – 105 शिवसेना – 56 राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 44 बहुजन विकास आघाडी – 03 प्रहार जनशक्ती – 02 एमआयएम – 02 समाजवादी पक्ष – 02 मनसे – 01 माकप – 01 जनसुराज्य शक्ती – 01 क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 शेकाप – 01 रासप – 01 स्वाभिमानी – 01 अपक्ष – 13 एकूण – 288
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.