Breaking News

विधानसभा निवडणूक विशेष : राज्यात ४७ ठिकाणी होणार मशाल-धनुष्यबाणाचा सामना

राज्यात दोन गोष्टींची जोरदार चर्चा सुरु आहे. एक म्हणजे दिवाळी आणि दुसरी म्हणजे विधानसभा निवडणुकीची ! पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार आहे. अनेक मतदारसंघात हा सामना पाहायला मिळणार आहे. राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ पैकी ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

या मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना

चोपडा
चंद्रकांत सोनवणे (शिंदे गट)
राजू तडवी (ठाकरे गट)

बुलढाणा
संजय गायकवाड (शिंदे गट)
जयश्री शेळके (ठाकरे गट)

मेहकर
संंजय रायमुलकर (शिंदे गट)
सिद्धार्थ खरात (ठाकरे गट)

बाळापूर
बळीराम शिरसकर (शिंदे गट)
नितीन देशमुख (ठाकरे गट)

रामटेक
आशिष जैस्वाल (शिंदे गट)
विशाल बरबटे (ठाकरे गट)

कळमनुरी
संतोष बांगर (शिंदे गट)
संतोष टारफे (ठाकरे गट)

परभणी
आनंद भरोसे (शिंदे गट)
राहुल पाटील (ठाकरे गट)

सिल्लोड
अब्दुल सत्तार (शिंदे गट)
सुरेश बनकर (ठाकरे गट)

कन्नड
संजना जाधव (शिंदे गट)
उदयसिंह राजपूत (ठाकरे गट)

औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाट (शिंदे गट)
राजू शिंदे (ठाकरे गट)

पैठण
विलास भुमरे (शिंदे गट)
दत्ता गोर्डे (ठाकरे गट)

वैजापूर
रमेश बोरनारे (शिंदे गट)
दिनेश परदेशी (ठाकरे गट)

नांदगाव
सुहास कांदे (शिंदे गट)
गणेश धात्रक (ठाकरे गट)

पालघर
राजेंद्र गावित (शिंदे गट)
जयेंद्र दुबळा (ठाकरे गट)

बोईसर
विलास तरे (शिंदे गट)
विश्वास वळवी (ठाकरे गट)

भिवंडी ग्रामीण
शांताराम मोरे (शिंदे गट)
महादेव घाटळ (ठाकरे गट)

कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (शिंदे गट)
सचिन बासरे (ठाकरे गट)

अंबरनाथ
बालाजी किणीकर (शिंदे गट)
राजेश वानखेडे (ठाकरे गट)

कल्याण ग्रामीण
राजेश मोरे (शिंदे गट)
सुभाष भोईर (ठाकरे गट)

ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (शिंदे गट)
नरेश मणेरा (ठाकरे गट)

कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ शिंदे (शिंदे गट)
केदार दिघे (ठाकरे गट)

मागाठणे
प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
उदेश पाटेकर (ठाकरे गट)

विक्रोळी
सुवर्णा करंजे (शिंदे गट)
सुनील राऊत (ठाकरे गट)

भांडुप पश्चिम
अशोक धर्मराज पाटील (शिंदे गट)
रमेश कोरगावकर (ठाकरे गट)

जोगेश्वरी पूर्व
मनिषा वायकर (शिंदे गट)
अनंत (बाळा) नर (ठाकरे गट)

दिंडोशी
संजय निरुपम (शिंदे गट)
सुनील प्रभू (ठाकरे गट)

अंधेरी पूर्व
मूरजी पटेल (शिंदे गट)
ऋतुजा लटके (ठाकरे गट)

चेंबुर
तुकाराम काते (शिंदे गट)
प्रकाश फातर्पेकर (ठाकरे गट)

कुर्ला
मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
प्रविणा मोरजकर (ठाकरे गट)

माहिम
सदा सरवणकर (शिंदे गट)
महेश सावंत (ठाकरे गट)

वरळी
मिलिंद देवरा (शिंदे गट)
आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

भायखळा
यामिनी जाधव (शिंदे गट)
मनोज जामसुतकर (ठाकरे गट)

कर्जत
महेंद्र थोरवे (शिंदे गट)
नितीन सावंत (ठाकरे गट)

महाड
भरतशेठ गोगावले (शिंदे गट)
स्नेहल जगताप (ठाकरे गट)

नेवासा
विठ्ठलराव लंघे पाटील (शिंदे गट)
शंकरराव गडाख (ठाकरे गट)

उस्मानाबाद
अजित पिंगळे (शिंदे गट)
कैलास पाटील (ठाकरे गट)

परांडा
तानाजी सावंत (शिंदे गट)
राहुल ज्ञानेश्वर पाटील (ठाकरे गट)

बार्शी
राजेंद्र राऊत (शिंदे गट)
दिलीप सोपल (ठाकरे गट)

सांगोला
शहाजी बापू पाटील (शिंदे गट)
दीपक आबा साळुंखे (ठाकरे गट)

पाटण
शंभूराज देसाई (शिंदे गट)
हर्षद कदम (ठाकरे गट)

दापोली
योगेश कदम (शिंदे गट)
संजय कदम (ठाकरे गट)

गुहागर
राजेश बेंडल (शिंदे गट)
भास्कर जाधव (ठाकरे गट)

रत्नागिरी
उदय सामंत (शिंदे गट)
सुरेंद्रनाथ (बाळ) माने (ठाकरे गट)

राजापूर
किरण सामंत (शिंदे गट)
राजन साळवी (ठाकरे गट)

कुडाळ
नीलेश राणे (शिंदे गट)
वैभव नाईक (ठाकरे गट)

सावंतवाडी
दीपक केसरकर (शिंदे गट)
राजन तेली (ठाकरे गट)

राधानगरी
प्रकाश आबिटकर (शिंदे गट)
के. पी. पाटील (ठाकरे गट)