kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन सिंदूर’; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला चोख प्रत्यतुत्तर दिले जावे अशी मागणी सातत्याने होत होती. आता अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे.

भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.

कुठे केले हल्ले?

बहावलपूर - आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास १०० किमी अंतरावरील हे ठिकाण असून तिथे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होते, जे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.
मुरीदके - हे दहशतवादी ठिकाण बॉर्डरपासून ३० किमी अंतरावर होते, तिथे लश्कर ए तोयबाचे सेंटर होते, जे २६/११ मुंबई हल्ल्याशी जोडले होते.
गुलपूर - हे दहशतवादी ठिकाणी LOC पासून ३५ किमी अंतरावर होते. 
लश्कर कॅम्प सवाई - पीओकेच्या तंगाधार सेक्टरच्या ३० किमीवर अंतरावर हे ठिकाण होते.
बिलाल कॅम्प - जैश ए मोहम्मदचं लॉन्चपॅड, हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरले जायचे
कोटली- एलओसीपासून १५ किमी अंतरावरील लश्कर ए तोयबाचा कॅम्प, याठिकाणी ५० हून अधिक दहशतवादी ट्रेनिंग घेत होते
बरनाला कॅम्प - LOC पासून १० किमी अंतरावर हे ठिकाण आहे
सरजाल कॅम्प - सांबा कठुआच्या समोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून ८ किमी अंतरावर जैशचं प्रशिक्षण केंद्र होते
मेहमूना कॅम्प - हे हिज्बुल मुझाहिद्दीनचे प्रशिक्षण सेंटर होते, जे बॉर्डरपासून १५ किमी अंतरावर होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *