kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

संतापजनक ! गिरगावमध्ये नोकरीसाठी मराठी माणसांनी येऊ नये ; महिला एचआरच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील गिरगावमध्ये नोकरीची संधी आहे मात्र मराठी लोकांनी येथे अर्ज करू नयेत, असा सरळ-सरळ उल्लेख असल्याने नोकरीच्या या जाहीरातीने मोठा वाद उफाळला आहे. वाद वाढताना पाहून महिला एचआरने आपली लिंक्डइन पोस्ट डिलीट केली तसेच कंपनीनेही आपला माफीनामा जाहीर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. गुजरातच्या एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरच्या पदासाठी मुंबईत नोकरीची तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर एक जाहिरात शेअर केली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे या जाहीरातीमध्ये तिने “येथे मराठी लोकांचे स्वागत नाही” (Marathi people are not welcome here ) असे लिहिले होते.

पोस्ट करणारी महिला एचआर गुजरातची असून एक फ्रिलान्स रिक्रुटर आहे. तिने मुंबईतील गिरगावमधील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनरच्या एका रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. या सगळ्या प्रकारामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या पोस्टमध्ये महिला एचआरने सांगितलं की कंपनी मुंबईत एका ग्राफिक डिझायनरच्या शोधात आहे. या पदासाठी उमेदवाराकडे कमीत कमी एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव हवा. त्यानंतर कंपनीला उमेदवाराकडून कोणत्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याची माहिती दिली आहे. त्यात सर्वात पहिली अट होती की, मराठी माणसाला येथे अर्ज करू शकत नाही, किंवा येथे मराठी लोकांचे स्वागत नाही. नोकरीची संधी महाराष्ट्रात आणि तीही मुंबईत असून कंपनीच्या HR कडून मराठी माणसाला डावललं गेल्यानं सर्वानाच धक्का बसला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एक्स अकाऊंटवरून नेटकऱ्यांनी महिला एचआरच्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर करत तिला ट्रोल केले आहहे. त्यानंतर तिने आपली लिंक्डइनवरील पोस्ट डिलीट केली. तिच्या प्रोफाइलवरून ही वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्यानंतरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणं थांबवलं नाही.

दरम्यान, महिला एचआरने दुसरी एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरच्या जागेसाठी जाहिरात पोस्ट केली होती. मात्र त्यातील एका वाक्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली आहेत. मी अशाप्रकारे कोणाविरुद्धही कोणत्याही भेदभावाचं समर्थन करत नाही. माझ्या नजर चुकीमुळे ती पोस्ट टाकली केली होती.

One comment
Kierron Matte

हा विषय अत्यंत खोल आहे आणि भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जर तो मिळत नसेल तर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार याला आता कायमचं लोटलं जाईल असं येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रातील लोकांना करण्यास भाग पडेल