दुःखद बातमी समोर येत आहे. पत्रकार अश्विन अघोर (५०) यांचे आज शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी राधिका आणि मुलगा सौमित्र असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

मुळचे अमरावतीचे अश्विन अघोर यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात नागपूर येथून ‘लोकमत टाइम्स’पासून केली त्यानंतर त्यांनी हिंदुस्तान टाइम्स आणि मुंबईत डीएनए या इंग्रजी दैनिकात काम केले. त्यांची पर्यावरण , खारपुटी रक्षण विषयामध्ये रुचि होती. काही काळ त्यांनी पर्याववरणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसोबत काम केले. उल्हास नदीतील औद्योगिक प्रदूषणरोखण्यासाठी हरित लवादाकडे पाठपुरावा करून एक खटला जिंकला त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या दीड-दोन वर्षापासून अश्विन यांचे ‘घनघोर’ नावाचे यू-ट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद मिळत होता.