Breaking News

दक्षिण कोरियातील विमान अपघातात 181 पैकी 179 जणांचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात 181 लोक होते. दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 4 विमान कर्मचाऱ्यांपैकी दोघांना वाचवण्यात बचावकर्त्यांना यश मिळालं आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरून भिंतीवर आदळल्यानं अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

योनहाप या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानाची पक्षांशी टक्कर झाल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता आहे. विमानतळाच्या अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने विमानाच्या मागील भागातून प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

विमानातील 181 लोकांमध्ये 175 प्रवासी आणि 6 विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जेजू एअरचं हे विमान थायलंडमधील बँकॉकहून परत येत होते आणि लँडिंग करत असताना हा अपघात झाला. योनहापच्या म्हणण्यांनुसार, अपघातानंतर बचाव मोहीम सुरू आहे. यात आतापर्यंत दोन जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. यात एका प्रवाशाचा आणि एका विमान कर्मचाऱ्याचा समावेश आहे. सत्यता न तपासलेल्या सोशल मीडियावरील फुटेजमध्ये विमान धावपट्टीवरून घसरून भिंतीवर आदळताना दिसत आहे. यानंतर विमानाच्या काही भागाला आग लागते. इतर फुटेजमध्ये काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात उठताना दिसत आहेत.

490 अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि 455 पोलीस कर्मचारी अशा एकूण 1562 जणांच्या बचाव पथकाच्या मदतीने अपघातग्रस्तांना वाचवण्याचं काम सुरू आहे, असंही दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीने नमूद केलं. तर, विमान उत्पादक कंपनी बोईंगने या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि या भीषण अपघातानंतर दक्षिण कोरियाच्या जेजू एअरच्या संपर्कात असल्याचे सांगितले.

जेजू एअरच्या म्हणण्यानुसार, हा अपघात बोइंगच्या 737-800 या विमानाशी संबंधित आहे. अपघात झालं ते मुआन ठिकाण दक्षिण कोरियाची राजधानी सोलच्या दक्षिणेला जवळपास 288 किमी अंतरावर आहे. दक्षिण कोरियाचा विमान वाहतूक उद्योग त्याच्या सुरक्षित विमान प्रवासासाठी ओळखला जातो. असं असताना हा अपघात घडला आहे.

हा अपघात जेजू एअरच्या इतिहासातील पहिला जीवघेणा अपघात आहे. जेजू एअरची 2005 मध्ये स्थापन झाली. ही कंपनी दक्षिण कोरियाच्या कमी दराने विमान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या सर्वात मोठ्या एअरलाइन्सपैकी एक आहे.

‘जेजू एअर’ या विमान कंपनीने काय म्हटलं आहे?

जेजू एअर या विमान कंपनीच्या इतिहासातला हा पहिलाच एवढा भीषण अपघात असल्याचं म्हटलं जात आहे.

दक्षिण कोरियातील जेजू एअर या कंपनीची स्थापना 2005 मध्ये झाली. दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांमध्ये ही कंपनी आहे.

जेजू एअरने निवेदन जारी करून म्हटले आहे की, “आम्ही, जेजू एअरतर्फे मुआन विमानतळावर झालेल्या अपघातात ज्यांचं मोठं नुकसान झालं आहे, अशा सर्वांची माफी मागतो.”

या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “आम्ही अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. या घटनेबद्दल आम्हाला दु:ख आहे.”

तर विमान उत्पादक कंपनी बोईंगने या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आणि या भीषण अपघातानंतर दक्षिण कोरियाच्या जेजू एअरच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.

जेजू एअरच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त विमान हे बोइंग कंपनीचं 737-800 मॉडेलचं विमान होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *