राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आज राज्यात 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, JN.1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे. आज दिवसभरात राज्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिका विभागात सर्वाधिक 19 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

राज्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 14 कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. हे रुग्ण पुणे आणि सांगली येथील असल्याची माहिती आहे. राज्यात कोरोना मृत्यू दर हा 1.81 टक्के इतका आहे.