गेली ३६ वर्षे अखंडीत यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केला जात आहे.
यंदाही सदर कविसंमेलन मंगळवार, दि. १२ मार्च २०२४ रोजी रात्री ९.०० वा. टिळक स्मारक मंदीर, टिळक रोड, पुणे येथे मा.ना. अजितदादा पवार (उपमु‘यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते व मा.राजा दीक्षित (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ)मा.सुनिलजी टिंगरे (आमदार, वडगावशेरी विधानसभा मतदार संघ), मा.प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
· कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ कला जीवन गौरव पुरस्कार – विलास रकटे (ज्येष्ठ मराठी अभिनेते) – रोख रु. २५,०००/ व मानचिन्ह
· कै. शिवाजीराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – अनिल धाकू कांबळी (कणकवली), कविता संग्रह – इष्टक – रोख रु. ११,००१/व मानचिन्ह
· कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – भीमराव धुळूबुळू (मिरज) कविता संग्रह – काळजाचा नितळ तळ – रोख रु.११,००१/व मानचिन्ह
· कै. धनाजी जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – गीतेश गजानन शिंदे (ठाणे) – कविता संग्रह – सीसीटीव्हींच्या गर्द छायेत – रोख रु. ११,००१/-
सदर पुरस्कार १२ मार्च रोजी होणार्या कवि संमेलनात देण्यात येणार आहेत. सदर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्री. रामदास फुटाणेे व अशोक नायगावकर हे करणार आहेत, असे श्री. रामदास फुटाणे, श्री. विजय ढेरे, श्री. संजय ढेरे, गौरव फुटाणे यांनी जाहीर केले.