Breaking News

CSK vs RCB Playing 11 : पहा अशी असेल आरसीबी-सीएसकेची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल २०२४ चा फिव्हर आज शुक्रवारपासून (२२ मार्च) सुरू होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमनेसामने असतील. आयपीएलचा उद्धाटनाचा सामना खूपच रोमहर्षक होऊ शकतो. कारण कागदावर दोन्ही संघ खूप मजबूत दिसत आहेत. या दोन्ही संघांकडे चाहत्यांचा मोठा आधारही आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या १७व्या हंगामाची सुरुवात ब्लॉकबस्टर ठरेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, आयपीएलच्या काही दिवसआधीच सीएसकेला झटका बसला होता. त्यांचा स्टार खेळाडू डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे अनुपलब्ध आहे. अशा स्थितीत ऋतुराज गायकवाडसोबत डावाची सुरुवात कोण करणार हा मोठा प्रश्न आहे.न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र ऋतुराजसोबत ओपनिंला खेळू शकतो. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे खेळेल, तर शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर येऊन खळबळ माजवू शकतो.

दीपक चहर सीएसकेच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मुस्तफिजुर रहमान आणि शार्दुल ठाकूर दीपकला सपोर्ट करताना दिसतील. चेन्नईचे वेगवान आक्रमण थोडे कमकुवत वाटत असले तरी संघाकडे फिरकी गोलंदाजांची भक्कम फौज आहे. महेश थीक्षाना, रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांची फिरकी गोलंदाजी चेपॉकमध्ये बंगळुरूच्या फलंदाजांची बत्ती गूल करू शकते.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यावेळी कागदावर खूपच मजबूत दिसत आहे. फलंदाजीत विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल तसेच रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांच्या रूपात संघाकडे मजबूत फलंदाजी आक्रमण आहे. यासह कॅमेरून ग्रीनच्या आगमनाने संघाची ताकद दुप्पट झाली आहे.

ग्रीन फलंदाजीसोबतच चेंडूनेही सामन्याचे चित्र बदलू शकतो.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे गोलंदाजी आक्रमण खूपच मजबूत दिसत आहे. संघाकडे मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन आणि आकाश दीप यांच्या रूपाने तीन मजबूत गोलंदाज आहेत. तर फिरकी विभागात करण शर्मा आपल्या फिरकीवर फलंदाजांना नाचवू शकतो.