मे महिन्यात सूर्य मेष आणि वृषभ राशीत संचार करतात. त्यामुळं मे महिन्याज जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये मेष आणि वृषभ राशीचे गुण अधिक असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळं त्याचा स्वभाव थोडा शांत तर कधी उग्र असा पाहायला मिळतो. या व्यतिरिक्त मे महिन्याज जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये सूर्याचे गुणही आढळतात. मे महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांबाबत सविस्तर जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रा नुसार, मे महिन्यात जन्माला आलेली मुलं मोजून मापून बोलणं पसंत करतात. मे मध्ये जन्माला आलेल्या मुलांमध्ये कोणत्याही समस्येवर उपाय शोधून काढण्याची कला असते. या महिन्यात जन्मलेले लोक दुनियादारीही लवकर शिकतात. त्यांच्यात एक वेगळेच नेतृत्व कौशल्य पाहायला मिळते. ते रणनितीकार आणि दुरदर्शी असतात. त्यांना जी जबाबदारी दिली जाते ती ते चांगल्या पद्धतीने निभावतात.

शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास मेमध्ये जन्माला आलेले लोकांमध्ये कोणतीही गोष्ट सखोलपणे समजून घेण्याची इच्छा असते. हे लोक विविध माध्यमातून सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मेमध्ये जन्माला आलेल्या लोकांमध्ये शिक्षणाची, लिखाणाची इतकंच नव्हे तर फोटोग्राफी व क्रिएटिव्ह, पेटिंगचादेखील छंद असतो. ते लोक या व्यवसायातही त्यांचे नशीब आजमावू शकतात.

मे मध्ये वाढदिवस असणारे लोकांचा स्वभाव खूप मनमोकळा व मिनमिळावू असतो. एक चांगला श्रोता आणि उत्कृष्ट संभाषणकार म्हणून ओळखले जाते. या क्षमतांमुळं त्यांचे नाते दीर्घकाळ टिकते. मे महिन्यात जन्मलेले लोकांमध्ये संघटनेचे नेतृत्व करण्याचे गुण असतात ज्यामुळे ते चांगले व्यापारी बनतात. मे मध्ये जन्मलेले लोक कलात्मक असतात. त्यांनी कोणतेही काम हाती घेतलं तर ते परफेक्ट करुनच सोडतात. प्रत्येक बारीक गोष्टींवर त्यांची नजर असते. मे मध्ये जन्मलेल्या व्यक्तींमध्ये अनेक चांगले गुण असतात. जे त्यांना जीवनात सफल होण्याची शक्ती देतात. हुशार व्यक्तीमत्व आणि समजूतदारपणा या व्यतिरिक्त साहसदेखील त्यांच्यात असते. त्यामुळं या महिन्यात जन्मलेली मुलं त्यांची महत्त्वकांक्षा पूर्ण करतातच.