kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

केनियात धरण फुटून ४० जणांचा मृत्यू

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण केनियामध्ये अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि महापुराचा सामना करत असताना धरण फुटल्याने ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर कित्येकजण बेपत्ता आहेत. केनियाच्या नाकुरु काउंटीमधील कामुचिरी गावात सोमवारी धरण फुटल्यानंतर लोकांनी हा परिसर मोकळा करण्याचा प्रयत्न केला. केनियाच्या नाकुरु काउंटीमधील माई माहूजवळील माती आणि ढिगाऱ्यातून बचाव पथके खोदकाम करत आहेत, नकुरु काउंटीच्या गव्हर्नर सुसान किहिका यांनी मृतांचा आकडा लक्षणीय वाढू शकतो, असा इशारा दिला आहे.

केनिया रेडक्रॉस सोसायटीने सोमवारी सांगितले की, कामुचिरी गावाला अचानक आलेल्या पुरामुळे अनेक ांना माई महिऊ येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. केनियाच्या नाकुरु काउंटीमधील माई माहूजवळील माती आणि ढिगाऱ्यातून बचाव पथके खोदकाम करत आहेत, नकुरु काउंटीच्या गव्हर्नर सुसान किहिका यांनी मृतांचा आकडा लक्षणीय वाढू शकतो, असा इशारा दिला आहे. केनियात मार्चच्या मध्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढल्याने मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

आयएफआरसीचे सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जगन चॅपगाईन यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अल निनोचा एकत्रित परिणाम आणि सध्या सुरू असलेल्या मार्च-मे २०२४ च्या पावसामुळे केनियाला भीषण पूर संकटाचा सामना करावा लागत आहे.”