Breaking News

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोटेरीयन हेमंत मुंडके

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा 23 जून रोजी उत्साहात पार पडला.

प्रमुख पाहुणे गव्हर्नर नोमिनी रोटेरियन हर्ष मकोल, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन विकास संकुलकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन प्रशांत आंबेकर, क्लब अध्यक्ष प्रदीप बुडबाडकर, निर्वाचित अध्यक्ष रोटेरियन हेमंत मुंडके, सचिव श्रीनिवासन मुदलियार आणि निर्वाचित सचिव रोटेरियन डॉ. सस्मित चौधरी व मिडटाऊन परिवार यांच्या उपस्थितीत सभेची सुरुवात झाली.

राष्ट्रगीतानंतर 4 वे टेस्ट रोटेरियन जितेंद्र नेमाडे आणि रोटेरियन अभिषेक सोनार यांनी घेतली. दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे रोटेरियन हर्ष मकोल यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्याचे अध्यक्ष रोटेरियन प्रदीप यांनी गतवर्षी केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अन्नदान, कारगिल रॅली, एसआरपीएफ जवानांसाठी रक्षाबंधन, भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, किडलेट स्टडी ॲपचे वितरण, समन्वय प्रदर्शन, मोफत डोळे तपासणी, झेडपी शाळांसाठी रक्तगट तपासणी, टाटा मेमोरियल सेंटर यांना बस आणि बोलेरो जीप देणे, एग बँक आणि उठावा-शाहापूर गावातील चेक डॅम यांचा समावेश होता.

निर्वाचित अध्यक्ष रोटेरियन हेमंत मुंडके यांची ओळख करून देण्यात आली. रोटेरियन हेमंत यांनी आगामी वर्षासाठी 365 दिवस अन्नदान, नवीन चेक डॅम, गाव दत्तक घेणे आणि लघुउद्योग प्रदर्शन यांसारख्या नियोजित प्रकल्पांची माहिती दिली.

नवीन पदाधिकारी आणि नवीन बोर्ड मेंबरची ओळख करून देताना त्यांनी सह अध्यक्ष, रोटरी डिस्ट्रिक्टचे अधिकारी आणि इतर मान्यवरांचा सत्कार केला. काही नवीन सदस्यांचा क्लब मध्ये समावेश करण्यात आला आणि रोटेरियन प्रशांत आंबेकर यांनी निर्वाचित गव्हर्नर दिनेश मेहता यांचा संदेश वाचून दाखवला.

प्रमुख पाहुणे रोटेरियन हर्ष मकोल यांनी क्लबच्या यशाबद्दल सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आणि आगामी प्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या.

सभेत सर्व क्लब सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि रोटरी क्लब नवनवीन शिखरे गाठण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता पुढील वर्षाचे अध्यक्ष रोटेरियन अनिल हिरावत यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.